जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना ३ वर्ष शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर संबंधित आस्थापना त्यांना नियमित शिक्षक म्हणून पदस्थापना देते. तसेच स्थायित्व प्रमाणपत्र देणे, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, आंतरजिल्हा बदली हे शिक्षण क्षेत्रातील विविध टप्पे आहेत. त्यासाठी वेळोवेळी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते.
मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपणाला लागणारे आवश्यक विविध प्रस्ताव नमुना देत आहोत. तसेच आपणाला तयार करायचे असल्यास उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी खालील प्रमाणे आवश्यक त्या लिंक वर क्लिक करा.
आपणाला प्रस्ताव तयार करायचा असल्यास खालील लिंकला क्लिक करा.
अ.
|
प्रस्ताव |
लिंक |
1 |
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव (१२वर्ष) |
https://forms.gle/ScKa97nNS4iJC5T68 |
2 |
निवड वेतनश्रेणी प्रस्ताव (२४वर्ष) |
https://forms.gle/gJaoZtGKQYrjzTMS8 |
3 |
शिक्षणसेवक नियमितीकरण प्रस्ताव |
https://forms.gle/fji3PfgLdgCiE7Lh7 |
4 |
आंतरजिल्हा बदली कार्यमुक्त प्रस्ताव |
https://forms.gle/Zb7KAU3U8XumWSqH6 |
5 |
जिल्हा अंतर्गत बदली प्रस्ताव |
https://forms.gle/35rJZGGEoE7AFPKp7 |
6 |
स्थायित्व प्रस्ताव |
https://forms.gle/SynnewXLZgNWLgPVA |
7 |
नवनियुक्त शिक्षणसेवकांना शाळेत रुजू अर्ज व रुजू अहवाल |
https://forms.gle/KmJvcfAeWPGX8hug6 |
शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित शिक्षक होण्याकरिता आपण शिक्षणसेवक कालावधीत कसे कामकाज केले? रजा किती घेतल्या ? या गोष्टीचे मूल्यमापन केले जाते. म्हणजेच त्या विषयीचा प्रस्ताव मुख्याध्यापक मार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केला जातो. आणि तेथून पुढे पंचायत समितीचे सर्व एकत्रित प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केले जातात. आणि त्यानंतर तपासणी करून आपले नियमित शिक्षक म्हणून आदेश पारित केले जाते. त्यानंतर आपल्या पूर्व वेतन श्रेणी लागू लागू होते.
त्यानंतर सेवेत स्थायी होणे ही तेवढेच महत्वाचे आहे. आंतरजिल्हा बदल घ्यायची असेल तर सेवेत स्थायी असणे आवश्यक असते. शिक्षणसेवक पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या संवर्गात येतो त्यानुसार आपल्याला पाहिजे असलेल्या जिल्ह्यात बदली घेता येते.