निवडणूक ड्युटी रद्द करणेबाबत अर्ज, कारणे व पुरावे

eStudy7
0

निवडणूक ड्युटी रद्द करणेबाबत अर्ज, कारणे व पुरावे

    निवडणूक ड्युटी रद्द करायची असल्यास निवडणूक आयोगाने योग्य ती कारणे व त्या संबंधी पुरावे सादर करणेबाबत पत्र जाहीर केले आहे. त्याप्रमाणे आपण ड्युटी रद्द करणेसंदर्भात अर्ज, कारणे व पुरावे कसे व कोणते सादर करावे ते बघणार आहोत.

१) अधिकारी/कर्मचारी दिव्यांग (PDW) असलेबाबत
    दिव्यांग (PDW) असलेबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडावा.

२) अधिकारी/कर्मचारी गरोदर (Pregnant) असलेबाबत
    गरोदर (Pregnant) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा.

३) अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असलेबाबत
    संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट शिफारस पत्र (अत्यावश्यक सेवेचे कामाचे वर्णन व कारण नमुद करावे.)

४) अधिकारी/कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत
    स्तनदा माता (Lactaling Mother) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा.

५) अधिकारी/कर्मचारी निलंबित असलेबाबत
    संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

६) अधिकारी/कर्मचारी फरार असलेबाबत
    संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

७) अधिकारी/कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असलेबाबत
    संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे.

८) अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असलेबाबत
    संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. (सेवा पुस्तक नोंद जोडावी)

९) अधिकारी/कर्मचारी गंभीर आजारी असलेबाबत
    १) गंभीर आजारी असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा.
    २) संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

१०) अधिकारी/ कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असलेबाबत (देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्विकारू नयेत)
    संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण, व्हिसा व विमान तिकीट जोडावे)

११) अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असलेबाबत
    संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (प्रवास दौरा पत्र जोडावे)

१२) अधिकारी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुबार आदेश असलेबाबत 
    टिप :- याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे.
    ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी/ कर्मचारी कामास तयार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायांकित प्रत जोडावी.

१३) अधिकारी/ कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असलेबाबत 
    टिप :- याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे.
    ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी/ कर्मचारी प्रत्यक्ष कामास आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी, अधिकारी/ कर्मचारी यांना जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायांकित प्रत जोडावी.

१४) कर्मचारी चतुर्थ श्रेणी /क्लास ४ मध्ये कार्यरत असलेबाबत (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये असल्यास) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत असलेबाबत.
    मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.

१५) अधिकारी/कर्मचारी हे वरिष्ठ पदावर (नायब तहसीलदार, तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतू महसुल, मनपा, विभागाशी संबधित अधिकारी तसेच आय ए एस व समकक्ष) कार्यरत असलेबाबत
    मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेऊन स्पष्ट शिफारस करावी.

१६) अधिकारी/कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असलेबाबत
    संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश जोडावा)

१७) अधिकारी/कर्मचारी मयत झाले बाबत
    संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

१८) अधिकारी/ कर्मचारी यांचा अपघात झाला असलेबाबत
    अपघात झाला असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. अधिकारी/कर्मचारी यांचे कुटुंबीयाकडून अर्ज आला असल्यास अपघातग्रस्त अधिकारी/कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे

१९) अधिकारी/कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा, मुलीचा विवाह असल्याबाबत (मतदान दिनांका पूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संबंधातील अर्ज स्विकारू नये.
    छापील लग्न पत्रिका व कार्यालय बुकींग पावती, रजिस्टर विवाह असल्यास रजिस्ट्रेशन कार्यालयाकडील टोकन पावती सादर करावी.

    बारामती मतदार संघ :-  
    दि. ०५ मे ते ०९ में २०२४ अर्ज स्विकारावा 
    उर्वरीत मतदार संघ :- 
    दि. ११ मे ते १५ मे २०२४ अर्ज स्विकारावा,

    
    वरील प्रमाणे कारणे असल्यास व योग्य कागदपत्रे असल्यास अर्ज मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अर्ज करतांना खालील प्रमाणे माहिती स्पष्ट लिहावी व सोबत आदेश (पाटपोट) जोडावा.

    अर्जदाराचे नाव.

    अर्जदाराचे कार्यालयाचे नाव..

    अर्जदाराचा दुरध्वनी क्रमांक

    अर्जदाराचा सुस्पष्ट अक्षरातील ई मेल

    अर्जदाराचा मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेशामधील Employee Code


संदर्भीय पत्र DOWNLOAD करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top