आजच्या आधुनिक काळात ऑनलाईन शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षण देवान घेवाण प्रक्रियेमध्ये शिक्षक फार महत्वाची भूमिका बजावत असते. अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल पद्धतीचा उपयोग करणे आजच्या काळाची गरज आहे. कोविड काळात शाळा बंद होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. पण तंत्रस्नेही शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध तांत्रिक माध्यमाचा उपयोग करून शिक्षण प्रक्रिया ऑनलाईन, मोबाईल, संगणक, इंटरनेट च्या माध्यमातून सुरु ठेवली होती. त्याचा परिणाम हि सकारात्मक दिसून आला आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण तंत्रस्नेही ई-साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे. ppt, व्हिडिओ मुळे शिक्षण प्रक्रिया आनंदमय होते. व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोपे होते. शिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ निर्मिती व्हावी आणि त्यातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोपी व्हावी. हेच उद्दिष्ठ ठेऊन राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 आयोजित केली होती.
त्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील शिक्षकांनी भाग घेतला होता. राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेकरिता खालील प्रमाणे गट तयार करण्यात आले होते.
- इयत्ता १ ली व २ री - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी)
- इयत्ता ३ री ते ५ वी - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास)
- इयत्ता ६ वी ते ८ वी - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे)
- इयत्ता ९ वी व १० वी - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे)
- इयत्ता ११ वी व १२ वी - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे)
- अध्यापक विद्यालय - (विषय : भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह)
- कोणत्याही सोफ्टवेअरचा वापर करून स्वत व्हिडिओ तयार करणे
- स्क्रीन रेकार्ड करून व्हिडिओ तयार करणे
- Animated व्हिडिओ तयार करणे
- पेन tablet चा वापर करून व्हिडिओ तयार करणे
- Immersive eContent वर आधारित व्हिडिओ तयार करणे
- खेळावर आधारित व्हिडिओ तयार करणे
- ई-चाचणी वर आधारित व्हिडिओ तयार करणे
- शासन प्रणालीवर आधारित बोलीभाषेतून व्हिडिओ तयार करणे
- शिष्यवृत्तीवर आधारित व्हिडिओ तयार करणे
- दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडिओ तयार करणे
- प्रथम क्रमांक - रु.३०००/- व प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक - रु.२०००/- व प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक - रु.१५००/- व प्रमाणपत्र
- प्रथम क्रमांक - रु.१००००/- व प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक - रु.९०००/- व प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक - रु.८०००/- व प्रमाणपत्र
- प्रथम क्रमांक - रु.५०,०००/- व प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक - रु.४०,०००/- व प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक - रु.३०,०००/- व प्रमाणपत्र
- व्हिडिओ निर्मितीसाठी आशय मजकूर आदर्श असावा
- व्हिडिओ विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन तयार करावा
- व्हिडिओ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर केलेला असावा
- व्हिडिओ मधील चित्रे, रंगसंगती अचूक असावी
- स्वतः केलेल्या व्हिडिओ, चित्रीकरण, एडीटिंग ला महत्व असेल
- व्हिडिओ मधील आवाज स्पष्ठ असावा
- कोणत्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थाचा वापर याचा समावेश करू नये
- वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रिया किंवा लिंग पुर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामुग्री असू नये
- तांत्रिक त्रुटी असू नये
- कोणत्याही कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन नसावे
- साहित्य चोरीचा समवेश करू नये
- शिक्षणिक अभ्यासक्रमावर व्हिडिओ बनविणे आवश्यक
- अध्ययन-अध्यापन शी निगडीत व्हिडिओ असावा
- व्हिडिओ तयार करणाऱ्या शिक्षकाचे नाव समाविष्ठ करू नये, शेवटी फक्त स्क्रीन वर करू शकता
- कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार हे सुरवातीला स्क्रीन वर दाखवणे
- व्हिडिओ लांबी कमीत कमी ५ मी. तर जास्तीत जास्त ९ मी. असावी
- व्हिडिओ mp4 formate मध्ये असावा
- कॉपीराईट मुसिक, फोटो चा वापर करू नये
- स्पष्टपणा - १५ गुण
- गरजाधीष्टीतपणा - १५ गुण
- परिणाम - १५ गुण
- नाविन्यता - १५ गुण
- समन्वय - १५ गुण
- उपयोगिता - १५ गुण
- चित्रफित दर्जा - १० गुण
- एकूण - १०० गुण