TAIT 2025: अर्ज प्रक्रिया, परीक्षा तारीख, अभ्यासक्रम आणि निकालाची संपूर्ण माहिती

eStudy7
0

    TAIT 2025 ही महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी महत्त्वाची परीक्षा आहे. या लेखामध्ये आपण TAIT 2025 च्या अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखा, अभ्यासक्रम, प्रवेशपत्र, आणि निकालाच्या संपूर्ण माहितीवर सविस्तर चर्चा केली आहे. जर तुम्ही TAIT 2025 साठी तयारी करत असाल, तर हा लेख नक्की वाचा.

     बहुप्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती २०२५ करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. करिता आज रोजी पासून फोर्म भरणे देखील सुरु झालेले आहे. मागील काळात २०१९ आणि २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती चे आयोजन करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने बरेच उमेदवार शिक्षक पदावर रुजू देखील झालेले आहेत.


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५

    आता हि आणखी मोठी भरती होणार आहे त्यामुळे डी.एड. आणि बी.एड. झालेल्या उमेदवारांसाठी हि महत्वाची परीक्षा ठरणार आहे. शिक्षक या पदावर रुजू होणे करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेणे आवश्यक आहे. मात्र हि परीक्षा देण्यासाठी १ ली ते ८ वी करिता टी.ई.टी (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) परीक्षा पात्र होणे आवश्यक आहे. तसेच ९ वी ते १२ वी शिक्षक पदावर रुजू होणे करिता टी.ई.टी (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) पात्र होणेची आवश्यकता नाही.

    म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ (TAIT Exam 2025) (१ ली ते ८ वी या वर्गांकरिता शिक्षक पदाकरिता शिक्षक) हि परीक्षा फक्त टी.ई.टी (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) पात्र उमेदवारच देऊ शकणार आहे.

    टी.ई.टी (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) परीक्षा परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असते. त्यामुळे टी.ई.टी (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) चे गुण गुणवत्ता यादी मध्ये गणल्या जात नाही.


अर्ज करण्याचे वेळापत्रक

अ.क्र.

तपशील

विहित कालावधी

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक

https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी

२६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क

भरण्याकरिता अंतिम दिनांक

१०/०५/२०२५ रोजी २३:५९ वाजे पर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा

कालावधी

परीक्षेच्या ७ दिवस आधीपासून

ऑनलाईन परीक्षा दिनांक

२४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ (प्रविष्ठ

उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक

सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या

संकेतस्थळावर कळविण्यात येईल.


टी.ई.टी. परीक्षा २०१८ आणि २०१९ गैरप्रकार बाबत सूचना

    टी.ई.टी. परीक्षा २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत शासनाने सक्त सूचना दिलेल्या आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ मध्ये अर्ज करतांना उमेदवारांनी वस्तुनिष्ठ माहिती भरणे अपेक्षित आहे. जर चुकीची माहिती भरली तर अर्ज रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषेदेने राखून ठेवलेला आहे. तसेच टी.ई.टी. परीक्षा २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकारातील उमेदवारांची यादी संपादणूक रद्द करण्यात आलेली असून संबंधित उमेदवारांची यादी परीक्षा परिषेदेने त्यांच्या संकेतस्थळावर http://www.mscepune.in/ जाहीर केलेली आहे. त्यामधील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही, जर चुकीची माहिती भरून अर्ज केला तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.


किती शिक्षकांची भरती होणार ?

    राज्यातील शिक्षकांच्या रिक जागा, प्रवर्ग नुसार, विषय, माध्यम व बिंदुनामावली पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


 परीक्षेचे माध्यम

    परीक्षेचे माध्यम मराठी, उर्दू व इंग्रजी असणार आहे. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) व्यतिरिक्त सर्व प्रश्न द्विभाषिक असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मराठी-इंग्रजी अथवा उर्दू-इंग्रजी यापैकी एक माध्यम अर्ज सादर करतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नातील अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी भाषेतील प्रश्न अंतिम समजण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांनी निवडलेले माध्यम फक्त चाचणी पुरतेच राहील.


अभ्यासक्रम

    सदर परीक्षा हि २०० गुणांची व २०० प्रश्नांची असणार आहे. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाकरिता १ गुण असणार आहे.

अ.क्र.

घटक

शेकडा प्रमाण

एकूण गुण

एकूण प्रश्न

अभियोग्यता

६०%

१२०

१२०

बुद्धिमत्ता

४०%

८०

८०

एकूण

१००%

२००

२००


अ) अभियोग्यता : या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/ आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकाचा समावेश असणार आहे 

ब) बुद्धिमत्ता : या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक असणार आहे.

क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी १२० मिनिटे असणार आहे. म्हणजेच १ प्रश्नासाठी सरासरी ३६ सेकंद एवढाच वेळ मिळणार आहे.


आरक्षण संदर्भात तरतुदी

    शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेता येईल. यामध्ये विविध मागास प्रवर्ग, महिला, माजीसैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्राविण्य प्राप्त खेळाडू, अनाथ, दिव्यांग इत्यादी आरक्षणाचा समावेश असेल.


उमेदवारांची पात्रता 

  1. उमेदवार भारतीय असावा
  2. किमान वयोमर्यादा १८ वर्षे
  3. शैक्षणिक, व्यावसायिक शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णयाप्रमाणे असावी, 

निवड प्रक्रिया

    निवड प्रक्रिया हि परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, विविध प्रकारच्या शाळेतील उपलब्ध पदे ग्राह्य धरले जाणार आहे.


ऑनलाईन अर्ज कोठे करावा?

    महाराष्ट्र राज्य मार्फत पुरवण्यात आलेल्या  https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या संकेतस्थळावर विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये नावाची नोंद हि आधार कार्ड प्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड दाखविणे अनिवार्य असणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि आधार कार्ड वरील नावात तफावत आढळल्यास अर्ज रद्द होणार आहे किंवा परीक्षेला बसता येणार नाही. तसेच मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अर्जात भरून परीक्षा प्रक्रिया संपेपर्यत सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यावरच परीक्षा परिषदेने वेळोवेळी दिलेल्या सूचना आपणाला मिळतील.

    अर्ज करतेवेळी पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र विहित पद्धतीने भरणे आवश्यक आहे. त्याबाबत स्पष्ट सूचना अधिसूचनेमध्ये दिलेल्या आहेत. तसेच दिलेल्या संकेतस्थळावर देखील माहिती उपलब्ध आहे.


परीक्षा शुल्क 

  1. खुल्या प्रवर्गासाठी : ९५० रुपये
  2. राखीव प्रवर्गासाठी : ८५० रुपये
  3. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
  4. यावर परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस असणार आहे

जिल्हा / परीक्षा केंद्राची निवड

    अर्ज सदर करतेवेळी ३ जिल्हा / परीक्षा केंद्राची निवड करता येणार आहे आणि ते अनिवार्य आहे. एकदा निवड केल्यानंतर जिल्हा / परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही. तसेच एखाद्या जिल्हा / केंद्राची क्षमता ओलांडली गेली तर इतर दुसऱ्या जिल्हा / अथवा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल.


प्रवेशपत्र

    परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून परीक्षेवेळी परीक्षा केंद्रावर सादर करावी. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. व प्रवेशपत्रावरील सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागेल. 

    परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व मूळ ओळखपत्राची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही मधील नाव समान असणे अनिवार्य आहे. जर तफावत आढळल्यास प्रवेश नाकारला जावू शकतो. तसेच अर्जातील आधार क्रमांक व आधार कार्ड वरील क्रमांक देखील समान असावा


परीक्षेस प्रवेश

    परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची स्पष्ट छायांकित प्रत व प्रवेशपत्रावरील सूचनेप्रमाणे साहित्यासह प्रवेश दिला जाईल.

    स्मार्ट वॉच, मायक्रोफोन, कॅमेरा, मोबाईल, ब्लूटूथ, पुस्तके, calculator, सीम कार्ड किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रोनिक वस्तू सोबत नेण्यास अथवा सोबत ठेवण्यास सक्त मनाई आहे. असे झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.


==============0=============

    अधिक माहितीकरिता वरील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजावी. वरील माहिती व अधिकृत संकेतस्थळामधील माहिती मध्ये काही तफावत असू शकतो. त्याची जबाबदारी आमचे संकेतस्थळ घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top